Once upon a time when Manuvad ideology was so deeply ingrained in every human being that to get out of it was to think that it was a sin.
But Dr. Babasaheb Ambedkar, a highly educated man from an untouchable community, decided to get out of the quagmire of this Hindu system.
Many generations had escaped the snare of this caste system and the only way to get them out was conversion.
"Even though I was born a Hindu, I will not die as a Hindu"
On 13th October 1935, while addressing his untouchable brothers at Yeola, Nashik, hearing the roar of Dr. Babasaheb Ambedkar, many people were still heartbroken.
After this roar of Dr. Babasaheb Ambedkar, not only the so-called pro-Hindu activists of the country were opposed but also the leaders who are referred to as "Harijans" say like Babu Jagjivan Ram in the Congress also opposed it and in various places there were protests and threats against Dr. Babasaheb Ambedkar.
Dr. Babasaheb Ambedkar was a fearless personality who did not beg for threats. After announcing his conversion, he started studying other religions.
They needed a religion that would instill confidence in the untouchable society, a tradition that would dispel such superstitions and give them a scientific vision.
Finally, he decided to convert to Buddhism on September 23, 1956, and also decided that Vijayadashami, or October 14, 1956, would be the time of conversion.
On 13 October 1956, Babasaheb told a press conference that he would not accept Hinayana or Mahayana Buddhism because it contained superstitions and evil things, so he would follow the teachings of the Buddha. Which was named "Navayan". He gave "pure Buddhism" to everyone in the form of Navayana. In which superstition and evil have no place.
On 14 October 1956, Dr. Babasaheb Ambedkar, along with 5 lakh followers, converted to Buddhism in Nagpur and revived the lost Buddhism in the country.
Today marks the 86th anniversary of the conversion of Yeola to Nashik in 1635.
Thanks to Dr. Babasaheb Ambedkar !
मराठी अनुवाद
एक काळ असा होता कि मनुवाद विचारसरणी प्रत्येक माणसात इतकी खोलवर रुतली होती कि त्यातून बाहेर पडणे म्हणजे पाप करतोय कि काय असं वाटत असे.पण एका अस्पृश्य समाजातील उच्च शिक्षित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या हिंदू व्यवस्थेच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला
कित्येक पिढ्या या जातिव्यवस्थेच्या जाळ्यात होरपळून गेल्या होत्या आणि आणि त्यांना बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे धर्मान्तर .
"मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही"
13 ऑक्टोबर 1935 येवला,नाशिक याठिकाणी आपल्या अस्पृश्य बांधवाना संबोधित करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली हि भीमगर्जना ऐकुन त्यावेळी व अजुन ही अनेक मनुवादी लोकांच्या छातीत धडधड होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या भीमगर्जनेनंतर देशातील तथाकथित हिंदुत्ववाद्यांची विरोध केलाच त्याचबरोबर काँग्रेसमध्ये हरिजन म्हणून संबोधल्या जाणार्या नेत्यांनी देखील याला विरोध केला व जागो जागी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात निदर्शने केली आणि धमक्या मिळत होत्या .
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे निडर व्यक्तिमत्व असल्या धमक्यांना भीक घालत नव्हते त्यांनी धर्मांतराच्या घोषणेनंतर इतर धर्माचा अभ्यास सुरु केला.
त्यांना अश्या धर्माची आवश्यकस्ता होती जो धर्म इथल्या अस्पृश्य समाजात आत्मविश्वास जागृत करणारा रूढी परंपरा अश्या अंधश्रद्धेला झुगारून देणारा वैज्ञानिक दृष्टी देणारा
आणि शेवटी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय 23 सेप्टेंबर 1956 रोजी घेतला आणि त्याचबरोबर धर्मांतराची वेळ येणारी विजयादशमी अर्थात 14 ओक्टोम्बर 1956 हि निश्चित केली .
13 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ते हिनयन किंवा महायान बौद्ध धर्म स्वीकारणार नाहीत कारण अंधश्रद्धा आणि वाईट गोष्टी त्यात आल्या आहेत, म्हणून ते बुद्धांच्या शिकवणींचे पालन करतील. ज्याला "नवयान" असे नाव देण्यात आले. त्यांनी प्रत्येकाला नवयनाच्या रूपात "शुद्ध बौद्ध धर्म" दिला. ज्यात अंधश्रद्धा आणि वाईट गोष्टींना स्थान नाही.
14 ओक्टोम्बर 1956 नागपूर येथे 5 लाख अनुयायांसोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारून या देशात लोप पावलेला बौद्ध धम्म पुन्हा पुनर्जीवित केला .
१६३५ ला येवला नाशिक येथे केलेली धर्मांतराच्या घटनेला आज ८६ वर्ष पूर्ण होत आहेत .
त्यानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन !
Post a Comment